Share

वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी

Published On: 

जालना: शनिवारी सकाळी सातच्या सुमारास औरंगाबादकडून येणारी भरधाव जप (बोलेरो) थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये घुसल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद-जालना रोडवर वरुडी येथील नूर हॉस्पिटलजवळ पोलिसांचा हा चेकपोस्ट उभारण्यात आला होता. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये भरधाव जीप घुसल्याने एक पोलिस कर्मचारी आणि दोन होमगार्ड किरकोळ जखमी झाले.

जालना-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील वरुडी येथील नूर हॉस्पिटलजवळ पोलिसांची चेकपोस्ट उभारण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची येथे तपासणी करण्यात येते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून भरधाव येत असलेल्या एका बोलेरा जीपने (एमएच ४२ एएक्स १६८७) सुरुवातीला चेकपोस्टच्या बॅरिकेड्सला धडक दिली. त्यानंतर जीप जवळच असलेल्या एका पानटपरीसह पोलिसांच्या राहुटीत घुसली. या अपघातात चेकपोस्टवरील पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन जारवाल हे गंभीर जखमी झाले. त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला.

या दुर्घटनेत कर्तव्यावर असणारे होमगार्ड चंद्रकांत लोखंडे व अमोल रगडे हे किरकोळ जखमी झाले, तर आरोग्य कर्मचारी के. व्ही. मोरे बालंबाल बचावले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच बदनापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहाेचले. या प्रकरणी जीपचालकाविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!