🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएल दरम्यान इंडियाचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. साहा आता करोना निगेटीव्ह आला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय वृद्धिमान साहाची भारतीय संघात निवड झाली आहे. २ जूनला टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. साहा अजूनही अनफिट आहे. त्याच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत चिंता असल्याने आता आंध्रचा यष्टीरक्षक-फलंदाज श्रीकर भरत भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे.
मात्र यावेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर साहाने गंभीर आरोप केले आहेत. एका प्रसिद्ध वाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘धोनी जेव्हा संघात होता तेव्हा मला जास्त खेळण्याच्या संधी मिळाल्याच नाहीत. २०१४ ते २०१८ या काळात मात्र मला चांगल्या संधी मिळाल्या. पण त्यानंतर मला दुखापत झाली आणि मी संघाबाहेर गेलो. त्यावेळी पार्थिव पटेल आणि रिषभ पंत हे भारतीय संघाकडून खेळले. पंतने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघातील स्थान कायम ठेवले आहे. पंतने संधीचे सोने केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा मी संधी मिळण्याची वाट पाहत आहे.’
महत्वाच्या बातम्या
- १ जून नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार ? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती…
- मोठी बातमी! बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव
- अफरीदीची मुलगी अडकणार लग्नबंधनात ; जावई आणि मुलीच्या नात्याबद्दल केला खुलासा
- ‘पति पत्नी और वो’ ; धनश्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
- बीसीसीआयच्या वार्षिक करारातील महिला आणि पुरुष मानधनातील तफावत; स्मीती मंधानाने मांडले मत

