Share

महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांना घरपोच प्रदान !

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०१९ राज्य पुरस्कार शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणास्तव सन २०१९ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन न करता सदर पुरस्कार संबंधित सर्व साहित्यिकांना घरपोच प्रदान करण्याचे शासनाचे आदेश आहेत.

महाराष्ट्र शासनाचा हा राज्य वाड:मय पुरस्कार बार्शीच्याही वाट्यास आला आहे. लेखक ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांच्या ‘यसन’ कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशाप्रमाणे ‘यसन’ कादंबरीस जाहीर झालेल्या श्री. ना. पेंडसे पुरस्काराचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी संतोष देशट्टीवार यांच्यामार्फत ज्ञानेश्वर जाधवर यांना दिनांक १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी घरपोच प्रदान करण्यात आले आहे.

स्वयंदीप प्रकाशन, पुणे प्रकाशित यसन कादंबरी वास्तव व मानवतावादी आहे. यसन ही मराठी साहित्यातील पहिली कादंबरी आहे, जी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या जगण्या व शिक्षणासंदर्भात भाष्य करणारी वास्तववादी साहित्यकृती आहे.

यसन ही कादंबरी व्यवस्थेतील अप्रत्यक्ष असणा-या यसनींवर भाष्य करते. खरं तर प्रत्यक्ष दिसणारी यसन ही बैलांच्या नाकात असते. पण माणसांच्या आयुष्यत दृश्य-अदृश्य असंख्य प्रकारच्या यसनी बांधलेल्या आहेत. ह्या यसनी १९९० च्या आसपास जन्मलेल्या पिढीला जास्त जाचक ठरूल्या. त्यामुळे त्यांचं जिवन अडचणींच्या कचाट्यात सापडलं आहे. या यसनी सोडवण्याचा प्रयत्न कादंबरीतील नायक वामन सोनवणे करू पाहत आहे, जो ऊसतोड काम करणा-या कुटूंबात जन्मला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!