Share

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : अजित पवार

Published On: 

नाशिक : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

आज देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप काका बनकर, नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, सय्यद पिंपरी गावचे सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जगभरात शेतमालाची निर्यात करणारा भारत महत्त्वपूर्ण देश : छगन भुजबळ

स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी खेड्यापाड्यात जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन कृषि क्रांती घडविली आहे. त्यामुळे आज आपला देश जगभरात शेतमालाची निर्यात करणारा महत्त्वपूर्ण देश बनला आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे सुरु ठेवून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी भरीव योगदान देणे महत्त्वाचे आहे. तसेच जिल्ह्यात अतिशय सुंदर क्रीडा संकुल उभे राहत असून यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!