🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.
आषाढी वारी, गणेशोत्सव यांच्यासह इतर सर्व धर्मियांचे सण-उत्सव, सामान्यांचे कार्यक्रम, व्यवसाय आदी बाबींवर राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत निर्बंध लावले आहेत. मात्र, दुसरीकडे राजकीय नेत्यांना मात्र या निर्बंधांतून सूट आहे कि काय ? असा सवाल निर्माण होतोय. शिवसेनेच्या नेत्याचा वाढदिवस जल्लोषात अक्षरश: लोकांच्या गराड्यात पार पडला. हे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेतेच त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत आहेत.
त्यामुळे दंड, कारवाई, नियम हे फक्त सामान्य जनतेवरच लागू केले जात असून नेत्यांच्या चुकीची भरपाई देखील या सामन्यांच्या नशिबी येत आहे. शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला असून कोरोना नियमांची पायमल्ली करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. यावेळी ते फक्त नियमांचं उल्लंघन करून थांबले नाही, तर सबंध महाराष्ट्राचे देशाचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीभोवती आलेले हार-तुरे कसेही टाकण्यात आले.
हा प्रकार समोर आल्यानंतर आता प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत काल ट्विटद्वारे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करतानाच राठोडांवर हल्लाबोल केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावेळी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा आयांसाठी चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता या अक्षम्य वर्तनामुळे चित्रा वाघ यांनी पुन्हा राठोडांवर निशाणा साधलाय.
ही आहे शिवसेना आमदार संजय राठोडच्या वाढदिवसाची हुल्लडबाजी
पक्षप्रमुख राज्याचे मा॰मुख्यमंत्र्यांचे सगळे आदेश पायदळी तुडवलेतचं शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती यांचे फेकलेले हारतुरे
वाह रे बहाद्दर वाह
पक्षप्रमुखांसोबत महाराजांचाही अपमान???? pic.twitter.com/unJ0C1zhEG— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2021
‘ही आहे शिवसेना आमदार संजय राठोडच्या वाढदिवसाची हुल्लडबाजी. पक्षप्रमुख राज्याचे मा॰मुख्यमंत्र्यांचे सगळे आदेश पायदळी तुडवलेतचं शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती यांचे फेकलेले हारतुरे…वाह रे बहाद्दर वाह! पक्षप्रमुखांसोबत महाराजांचाही अपमान,’ असं ट्विट चित्र वाघ यांनी करत सोबत फोटो देखील शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?’
- ‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’
- संतापजनक ! ‘संजय राठोडांच्या वाढदिनी शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती फेकून दिलेले हार-बुके
- एक ना एक दिवस मी पंतप्रधान जरुर होईन; त्यासाठी कोणाचाही आधार घेईन – महादेव जानकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

