बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगावर तालुक्यातील अंबिकापूर चितोडा येथे जुन्या वादातून १९ जून रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत चाकूही चालला. गावताली हिवराळे व वाघ कुटुंबीयांत गेल्या महिनाभरापासून वाद सुरु आहे. तो वाद उफाळून आल्याने दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. यावेळी तर सागर दिनकर वाघ यांचे ट्रॅक्टर व मालवाहू पिकअप वाहन पेटवून देण्यात आले. या घटनेमुळे अंबिकापूर येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नुकतीच गावात भेट देऊन ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. गावात असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मी स्वत: १० हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करु, असे वादग्रस्त विधान केल आहे. याबाबत टिव्ही ९ या वृत्तसमुहाने बातमी प्रकाशित केली आहे.
बातमीत म्हटले आहे की, ‘ॲट्रॉसिटीचा धाक धाकवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडल्याचे वाघ कुटुंबीयांनी सांगितले. त्यावर आमदार संजय गायकवाड म्हणाले की, हल्ला झालेल्या वाघ कुटुंबासोबत आम्ही आहोत. भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी हजारोंची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा.’
पुढे ते म्हणाले की, अट्रॉसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या. चितोड्यात येण्यासंदर्भात आपल्याला थेट ‘मातोश्री’वरून आदेश आला आहे. ॲट्रॉसिटी हा कायदा रक्षणाकरिता आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो.
ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात. अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. एक विशिष्ट समाज कमी संख्येने असल्याने आणि संघटित नसल्याने इथे वारंवार हल्ले होतात. आपल्यावर कुणी अन्याय करत असेल तर आसपासच्या २५ गावांच्या तरुण पोरांची संघटित टीम बनवा. अन्याय होईल तेव्हा सर्व जण तुटून पडा असेही आमदार गायकवाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?
- अन् सोलापूर पोलिसांनी आ.गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल केला!
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

