Share

गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?’

Published On: 

सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. सोलापूरातील मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. कोरोनाचे निर्बंध असतानाही दुपारी ४ नंतर बैठक घेतल्यामुळे पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारने दुपारी चारनंतर राज्यांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. या कालावधीत जमावबंदीचा नियम मोडल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पडळकर आणि २९ समर्थकांवर सोलापुरमध्ये जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम 1860/188/269 आणि 336 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 ब नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई केल्याने पडळकर संतप्त झाले आहेत. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘नियमांची पूर्ण काळजी घेत आम्ही घोंगडी बैठक आयोजित केली होती. पण ही बैठकही झाली नाही. पोलिसही तिथे उपस्थित होते. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर करा. पण पुणे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्धाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पडळकर यांच्या गाडीवर हल्ला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी बुधवारी टीका केली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावरून आमदार पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. रात्री आठच्या सुमारास ते जोडभावी पेठ पोलिस ठाणे परिसरातील मड्डी वस्तीतील एसबीआय कॉलनीसमोरून जाताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगड फेकला. या प्रकरणी गुरुवारी जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये दोघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाचा फोटो समोर आलाय. अमित सुरवसे असं या तरुणाचं नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबतचे फोटोही समोर येत आहेत. गोपीचंद पडळकर यांनीही अमित सुरवसे याचा रोहित पवारांसोबतचा फोटो ट्वीट केलाय. दरम्यान, अमित सुरवसेवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!