🕒 1 min read
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबीपणा, सडेतोड उत्तर आणि कार्यक्षम व्यक्तिमत्वामुळे ओळखले जातात. फडणवीस सरकार आधी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. यानंतर आता महाविकास आघडी सरकारमध्ये देखील अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हातमिळवणी करून काही तासांसाठी अस्तित्वात आलेल्या सरकारमध्ये देखील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
त्यामुळे आता अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या खंद्या समर्थकांची इच्छा आहे. दरम्यान, अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कामकाज आवरल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना इतर कामांसह विचारण्यात आलेल्या एका प्रश्नांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे, ‘अजित पवार हे कितीतरी वेळा उपमुख्यमंत्री झालेत, आता त्यांना मुख्यमंत्रीपदी प्रमोशन व्हावं असं वाटत नाही का ?’ या प्रश्नाची !
का माध्यमाच्या प्रतिनिधीने हा सवाल केल्यांनतर अजित पवार यांनी देखील त्यांच्या शैलीत लगेच उत्तर दिलं. ‘मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं, असं वाटत नाही. सगळ्यांनाच प्रमुख व्हावं वाटतं, पण एकच प्रमुख होऊ शकतो. तसंच, आम्ही आमचा मुख्यमंत्री म्हणून एक जण बसवला आहे. तो ही पाच वर्षांसाठी बसवला आहे. त्यामुळे आता पाच वर्ष याचा विचारच करायचा नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेत्यांनी हे सरकार बनवलं आहे. पवार साहेबांसह इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी देखील हे सरकार पाच वर्ष टिकणार असं सांगितलं आहे,’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वाह रे बहाद्दर वाह! शिवाजी महाराजांच्या मूर्तीभोवती फेकलेले हार-तुरे’
- गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?’
- दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनही महाविकास आघाडी सरकारला जड जाणार
- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना अद्दल शिकवा, त्यांना ठेचा, मी शस्त्र व ताकद पुरवतो’, शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
- एक ना एक दिवस मी पंतप्रधान जरुर होईन; त्यासाठी कोणाचाही आधार घेईन – महादेव जानकर


