🕒 1 min read
नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील काही आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली धरली आहे.
२६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.
या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोसाला दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरलं आहे. आंदोलकांना भडकावल्या प्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर, योगेंद्र यादव यांच्यासह ३७ शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. लाल किल्ल्यावरील घटनेच्या आडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे ते म्हणाले.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत कट करून हिंसाचार घडवून आणला. सरकारला हिंसाचाराचे कारण मिळाले असून आता त्याआडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी ठरलेल्या मार्गावरून मोर्चा काढत होते. मात्र, काही ठराविक गटाने मार्ग बदलला आणि गोंधळ घातला. ज्या मार्गावरून लाखो शेतकरी शांततेत चालले होते तेथे जाणूनबुजून हिंसाचार घालण्यात आला, असे येचुरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- बुलढाण्याला आगामी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधी देण्याची अशोक चव्हाण यांची तयारी
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष करणार; निलेश राणेंची सिंहगर्जना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

