🕒 1 min read
कोल्हापूर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या वर्षीपासून चांगलेच चर्चेत असतात. पवार कुटुंबियांसह महाविकास आघाडीवर सातत्याने केलेली बोचरी टीका, आंदोलने यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. सोलापुरात घोंगडी बैठकीत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवार हे मोठे नेते नाहीत, ते फक्त साडेतीन जिल्ह्यांच्या पक्षाचे स्वामी आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली होती.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाली असून पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना चांगलाच रंगला आहे. दरम्यान, पडळकरांना कोल्हापुरात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. आज राष्ट्रवादीतर्फे कोल्हापुरात घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी भाजपसह गोपीचंद पडळकर यांना इशारा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर हे अनेक मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. मात्र राजकीय टीका न करता अनेक अपशब्द वापरून गलिच्छ राजकारण करत आहेत. भाजपाने त्यांना आवर घालावा. जर गोपीचंद पडळकर कोल्हापुरात आले तर त्यांची गय केली जाणार नाही. त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा ए.वाय. पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
- ‘राज्याची चिंता असेल तर अधिवेशन चालू द्या, गोंधळ घालू नका’, खा.राऊतांचे विरोधकांना आवाहन
- ‘जहाँ हमारे नाम से आग लग जाती है!’, राऊतांचा शायरीतून वार
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- ‘होय, मी शेलारांना भेटलो! आम्ही कॉफीही पिलो’, ‘त्या’ भेटीवर राऊतांचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
