मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात भेट झाल्याची चर्चा काल राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. मात्र याबाबत आता संजय राऊत यांनी स्वत: खुलासा केला आहे. आमच्यात कोणतीही भेट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो होतो. पण ते उघडपणे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. तसंच आमच्या भेटीच्या निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मागे एकदा मी शेलारांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही उघडपणे कॉफी प्यायलो होतो, असं सांगतानाच जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ. मजबूतीने एकत्र येऊन. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील’, असे राऊत म्हणाले.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/zysAyFakcb
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 4, 2021
दरम्यान, यानंतर राऊत यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला आहे. ‘मी ज्यांच्या डोळ्यात खुपतो किंवा ज्यांना माझा त्रास वाटतो, अशी लोकं जाणीवपूर्वक या अफवा पसरवत आहेत, अशा आशयाची शायरी त्यांनी ट्विट केली आहे. ‘हमारी अफवाह के धुएं वही से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है’, असे ट्वीट त्यांनी केले. सोबतच ‘जय महाराष्ट्र’ असेही लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’, परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने युवकाची आत्महत्या
- ‘होय, मी शेलारांना भेटलो! आम्ही कॉफीही पिलो’, ‘त्या’ भेटीवर राऊतांचा खुलासा
- ‘मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणे अयोग्य’, धनंजय मुंडेंचा संभाजीराजेंना टोला
- ‘प्रयत्न सोडून दे आता तुझी इमेज सुधारणार नाही’ ; सुशांतच्या चाहत्यांकडून रिया पुन्हा ट्रोल
- श्रीलंकेत असलेल्या टीम इंडियाचा सराचा व्हिडिओ व्हायरल ; प्रशिक्षकाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया


