Share

‘होय, मी शेलारांना भेटलो! आम्ही कॉफीही पिलो’, ‘त्या’ भेटीवर राऊतांचा खुलासा

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन आहे. परंतु कॉंग्रेस मात्र सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. तर शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती की काय ? असे प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले होते.

महाराष्ट्रातील अशा सर्व भीषण राजकीय परिस्थितीत आज शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात काल शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची चर्चा होती. या बातमीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात तर या बातमीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर संजय राऊत यांनी काल या भेटीबद्दल प्रतिक्रिया न दिल्याने यातील सस्पेन्स वाढला होता. मात्र, आता आज राऊत यांनी या भेटीवर भाष्य केले आहे.

राऊत म्हणाले, अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या.’

तसेच राऊत यांनी सांगितले की, ‘मागे एकदा मी शेलारांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही उघडपणे कॉफी प्यायलो होतो. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. त्यामुळे राजकारणात भेटीगाठी होत असतात. जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ. मजबूतीने एकत्र येऊन. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!