🕒 1 min read
मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन या निवडणुकीसाठी जोर लावला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर भाजपने झेंडा फडकावल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, या निकालानंतर अजूनही टीका-टिपण्णीच सत्र सुरु आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघडीला लक्ष्य केलं आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, असं विधान पडळकर यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीपूर्वी १५ ते २० दिवस अशी वक्तव्य होती की आम्ही ५० ते ८० हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहोत. अजितदादांचं वक्तव्य होतं की ४ पक्षांपैकी ३ पक्ष आम्ही एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? तो माईचा लाल समाधान अवताडेंच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे आविर्भावात वागत होते की आम्ही तिघं एकत्र आहोत, त्यामुळे जे आम्ही म्हणू तेच होईल. विश्वासघातानं सत्तेत येता येतं, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत,’ अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने सांगितले मेकअप न करण्यामागचे कारण
- ‘राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नव्हे, तर…’; गडकरींचा मोलाचा सल्ला
- अभिनेत्री सारा अली खानने कोरोना परिस्थितीत दिले सोनू सूद फाऊंडेशनला योगदान
- ‘मी तिला वाचवू शकलो असतो तर..’ ; सोनू सुदने व्यक्त केले दु:ख
- काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे हेमंत बिस्वा शर्मा होणार आसामचे नवे मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
