मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत ही वाढत होत आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाची या बिकट परिस्थितीमध्ये बॉलवूडमधील अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेत्री सारा अली खान ही देखील गरजवंताच्या मदतीसाठी पुढे आली आहे. सारा अली खानने सोनू सूद फाऊंडेशनला योगदान दिलं असल्याने तिचे सोनू सूदने कौतूक केलं आहे. सारा अली खानने दिलेल्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी सोनू सूदने ट्विट केलं आहे.
Thank you so much my dear Sara Ali Khan for your contribution to the @soodfoundation! Extremely proud of you & keep on doing the good work. You have inspired the youth of the nation to come forward and help during these difficult times. You are a hero ????@sara_ali_khan95
— sonu sood (@SonuSood) May 8, 2021
या ट्विटमध्ये त्याने सारा अली खानचं कौतूक करत आभार व्यक्त केले आहे. या ट्विटमध्ये सोनू सूदने लिहिलं, ” प्रिय सारा अली खान, सूद फाऊंडेशनसाठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप आभार. तुमचा गर्व वाटतोय आणि असंच तुम्ही काम करत रहा. अशा कठीण परिस्थितीत पुढाकार घेऊन देशातील युवा पिढीला तुम्ही प्रेरित केलं आहे. तुम्ही हिरो आहात सारा अली खान.”
गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच यावेळी कोरोना रूग्णांसाठी मदत करण्याचे आवाहन देखील तिने केलं. आता तिने सोनू सूद फाऊंडेशनला योगदान दिल्याने तिच्या या कामगिरीबद्दल सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी देखील तिचे कौतुक करत तिला प्रोत्साहित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारण सुरू आहे – चव्हाण
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावे : शिंदे
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- ऑक्सिजन निर्मितीबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल सुरु आहे – गावीत


