🕒 1 min read
गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत भाजपाने आसामचा गड राखण्यात यश मिळवले आहे. आसाममध्ये भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचं निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती.
माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अखेर हे चित्र रविवारी स्पष्ट झालं. सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा यांनी बाजी मारली आहे.सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडेल.
Assam | Himanta Biswa Sarma elected as the leader of the BJP legislative party in Assam: Union Minister & BJP leader Narendra Singh Tomar pic.twitter.com/Ati3guvJW3
— ANI (@ANI) May 9, 2021
आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आजच आपला राजीनामा राज्यपालांना सोपवला. तसेच, त्यांनी पूर्वीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले होते. आज होणाऱ्या बैठकीत आपण हेमंत बिस्व शर्मा यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करणार असल्याचे सोनोवाल यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, आज दुपारी पक्षाच्या बैठकीनंतर हेमंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.शनिवारी दिल्लीमधील बैठकांनंतर सोनोवाल, हेमंत बिस्व, तसेच पक्षाचे महासचिव अर्जुन सिंह, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर भाजपाचे आसाम प्रदेशाध्यक्ष बैजयंत पंडा आणि पक्षातील आणखी नेते रात्री उशीरा आसाममध्ये पोहोचले होते.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश घेतला. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आसाममध्ये भाजपाची ताकद चांगलीच वाढली.खरतर 2016मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते.
2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपने सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. आता परिस्थिती बदलली आहे. सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपला विजय मिळवून दिला असल्याने मुख्यमंत्री पदी त्यांची वर्णी लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारण सुरू आहे – चव्हाण
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- भाजपच्या आमदार आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांची कोविड सेंटरवर धक्काबुक्की
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
