Share

‘राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नव्हे, तर…’; गडकरींचा मोलाचा सल्ला

Published On: 

नागपूर : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एका ऑनलाईन बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांची कान उघडणी देखील केली आहे.

‘आपल्या सेवाकामाचा मर्यादित प्रचार करणे ठीक आहे. मात्र, त्याचा फार बागुलबुवा करणं हे चूक आहे. एक ऑक्सिजन कोसंट्रेटर पुरवून चार जण फोटो काढतायत आणि वारंवार पसरावतायत, असं करू नका. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाहीये. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे. नुसतं निवडणुका लढवून सत्तेत येणं हा त्याचा अर्थ नाही,’ असा मोलाचा सल्ला गडकरी यांनी दिला असून कोरोनाला गांभीर्याने घ्या. मला काही होणार नाही असं म्हणून हलगर्जीपणा करण्यापेक्षा योग्य काळजी घ्या, असे खडेबोल देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!