Share

‘मी तिला वाचवू शकलो असतो तर..’ ; सोनू सुदने व्यक्त केले दु:ख

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे अनेक लोकांपुढे मोठे संकट निर्माण झाले होते. अशा काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या कोरोनाच्या संकट काळात अनेकांच्या मदतीसाठी पुढे आला. आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा देशातील वातावरण ढवळून निघालं आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजन, बेडस्, औषधांचा तुडवडा निर्माण झालाय. मात्र अशातही अभिनेता सोनू सूद गरजवंतांच्या मदतीला धावून जात आहे. प्रत्येक गरजूची मदत करण्यासाठी सोनू सूद नेहमीच प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्याच्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचले आहे. मात्र यावेळी सोनूच्या अथक प्रयत्नांनतरही त्याला एका मुलीचा जीव वाचवता आला नसल्याने सोनू सुदला अत्यंत दु:ख झाल आहे.

नागपूरमधील एका २५ वर्षीय मुलीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने एका महिन्यापूर्वी सोनू सूदने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर काल रात्री भारतीने अखेरचा श्वास घेतला. ही बातमी कळताच सोनूने दु:ख व्यक्त करत ट्विट केलं आहे. यामध्ये तो म्हणाला की, ” नागपूरची तरूण मुलगी भारती जिला मी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेलं होतं तिने काल रात्री हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. ECMO मशीनच्या मदतीने ती महिनाभर जिवंत होती. तिच्या कुटुंबातील आणि इतर सर्व ज्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांसाठी मला वाईट वाटतंय. मी तिला वाचवू शकलो असतो तर. आयुष्य हे खूप अस्थिर आहे.”

सोनू सूद या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सतत डॉक्टरांच्या संपर्कात होता. डॉक्टरांनी भारतीची जगण्याची शक्तता अगदी कमी असल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र तरीही सोनूने तिला अधिक उत्तम उपचारासाठी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केलं होत. त्याच्या या प्रयत्नानंतर देखील भारतीचे प्राण वाचवणे शक्य न झाल्यामुळे तो खूप निराश झाला असल्याचे या ट्वीटद्वारे समजत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!