Share

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने सांगितले मेकअप न करण्यामागचे कारण

Published On: 

मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारी अभिनेत्री साई पल्लवीचा आज वाढदिवस आहे. २९ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्या चाहत्या वर्गाने तिला शुभेच्छा दिल्या आहे. ‘प्रेमम’ या चित्रपटामुळं साईला प्रसिध्दी मिळाली. तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री म्हंटल की मेकअप हा आलाच. जवळ जवळ सगळ्याच अभिनेत्री या मेकअप शिवाय अभिनय करत नाही. परंतु आता तुम्हाला आश्चर्य वाटेल साई कधीच मेकअप करत नाही. याआधी साईनं मेकअप न करण्याचे कारण सांगितलं होत.

ती म्हणाली होती, “मेकअप करण्याला माझा विरोध नाही. पण मेकअप का करावा? त्या मागचा उद्देश काय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या देशात गौरवर्णीय महिलांना सुंदर म्हटलं जातं. त्यामुळं महिला गौरवर्णीय दिसण्यासाठी कॉस्मेटिकचा भरमसाठ वापर करतात. या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. कारण आपल्या त्वचेचा रंग कुठला असेल हे आपल्या हातात नाही. मग गोरं दिसण्याचा अट्टहास कशाला? अन् जे गोरे आहेत त्यामागे त्यांचं कर्तृत्व काय? त्यामुळं मी गोरं दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मेकअप करत नाही. मला लोकांनी स्विकारावं अशी माझी अपेक्षा आहे.”

साईनं तिच्या करिअरमध्ये कधीही कुठल्याही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम केलेलं नाही.  तिने अशा अनेक कोट्यवधींच्या जाहिरातींना विरोध केला आहे. शिवाय ज्या चित्रपटांमध्ये मेकअप करण्यासाठी जबरदस्ती केली ते चित्रपट देखील तिनं सोडले आहेत. मात्र असे असूनही ती  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!