मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण,धनगर आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.
दरम्यान,आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जोरदार आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून आणि पारंपारिक वेशभूषेत सभागृह परिसरात पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं असताना गोंधळ झाल्याचं चित्र होतं.
धनगर आरक्षण प्रश्नावर झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी धनगरी वेष परिधान करून ढोल वाजवत आंदोलन करत आहे, हा वेष आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे, या अस्तित्वाशी खेळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय.या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावात फिरणं मुश्कील होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असं वाटत असेल, पण आम्ही मोडीत काढू,” असं यावेळी ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर देखील भाष्य केले. ‘शेतकऱ्यांचे दलाल हे शेतकऱ्यांचे नेते असल्याचं भासवत आहेत. प्रश्न मुळापासून मिटवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. पण, प्रश्न कायम राहिला पाहिजे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं धोरण आहे असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सरकारनं ३७० कलम रद्द केलं. तीन तलाकचा कायदा केला. राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात केली. सीएए-एनआरसीचा कायदा आणला. आता त्यांनी शेतकऱ्यांचे कायदेही मंजूर करून घेतले, तर आमचं दुकान बंद होईल, असं काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक खासगीत बोलतात. म्हणूनच ही महाविकास आघाडी मोदी सरकारच्या विरोधात काम करतेय,’ असा गंभीर आरोप पडळकरांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- कंगना रनौत आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात आ.सरनाईक यांच्याकडून हक्कभंग प्रस्ताव
- कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही … मुनगंटीवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी
- धनगर आणि आदिवासींच्या प्रश्नी पडळकरांचे हटके आंदोलन,ढोल वाजवून केला सरकारचा निषेध
- महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवाजी‘ चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?
- ‘कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच; शेतकऱ्यांनी दोन पाऊले मागे हटून सरकार शी चर्चा करावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

