Share

पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स

Published On: 

पुणे : पुण्यातील हत्या झालेल्या सराईत गुंडाच्या वाढदिवसाला त्याच्या टोळक्यातील सदस्यांनी तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुंड भावेश कांबळे याचा खुन झालेला असतानाही त्याचा वाढदिवस साजरा करताना हातात गावठी पिस्तुल घेऊन कांबळेच्या नावाने घोषणा देणाऱ्या गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यायुनिट २ ने जेरबंद केले.

अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर (रा. बिबवेवाडी) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल आणि काडतुस असा २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या वर्षी सराईत गुन्हेगार भावेश कांबळे याची हत्या झाली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खून झालेल्या आरोपीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी सात जुलै रोजी 10 ते 15 जण जमले होते. त्यांनी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली होती. तसेच, आरोपीच्या नावाने घोषणाबाजी केली होती.

जमलेल्या टोळक्यामध्ये अक्षय कानिटकर देखील होता. तो बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ असल्याची माहिती पोलिस कर्मचारी उत्तम तारू व मितेश चोरमाले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!