Share

पराभुत महिला हॉकी संघाला शाहरुख खानने दिला ‘हा’ संदेश, म्हणाला..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्य फेरीच्या पराभवानंतर कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनकडून देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

कांस्यपदकाच्या या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला संघाला प्रोत्साहन देण्यासाठी बॉलीवूडचा किंग खानने एक खास संदेश दिला आहे. ‘दु:खद!!! पण सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही आमची मान उंचावली आहे. इंडियन वुमन हॉकी टीम तुम्ही खुप चांगला खेळ केला. संपुर्ण देशासाठी तुम्ही एक प्रेरणा आहात. हाच खरा विजय आहे.’ अशा शब्दात शाहरुख खानने महिला हॉकी संघाचे मनोबल वाढवले आहे.

यापुर्वी उपांत्यपुर्व फेरीत देखील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभुत केले होते तेव्हा शाहरुख खानने सुवर्णपदक घेऊन या असे ट्विट केले होते. शाहरुख खानने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघासमोर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनचे आव्हान होते. या सामन्यात भारताने जोरदार लढत दिली. परिणामी पहिल्य सत्रात एकही गोलची नोंद झाली नाही. मात्र दुसऱ्या सत्रात तब्बल ५ गोल झाले. यात भारताने ३ तर ब्रिटनने २ गोल केले होते. यानंतर चौथ्या आणि पाचव्या सत्रात एक-एक गोल करत ब्रिटनने भारतावर आघाडी घेत विजय मीळवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!