नवी दिल्ली : बार्सिलोनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीचे या क्लबशी असलेले 21 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार ३० जून रोजी संपला. यानंतर क्लब आणि मेस्सी यांच्यात पगारावर नवीन करार होऊ शकला नाही. आता मेस्सी कोणत्याही क्लबमध्ये सामील होण्यास मोकळा आहे.
मेस्सीचा बार्सिलोनाशी करार संपल्यानंतर, तो आता त्याच्या स्पॅनिश क्लबकडून अर्ध्या पगारावर खेळणार असल्याची बातमी आली. गेल्या महिन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने कोपा अमेरिका 2021 ची अंतिम फेरी जिंकली होती.
बार्सिलोना क्लबने आपल्या निवेदनात म्हटले आहे की दोन्ही बाजूंचे प्रयत्न आणि संमती असूनही आर्थिक परिस्थितीमुळे नवीन करार होऊ शकला नाही. यामुळे या दोघांचा सुवर्ण प्रवास संपुष्टात आला. स्पॅनिश क्लब बार्सिलोना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बार्सिलोना क्लबवर $ 1.18 अब्ज (सुमारे 8000 कोटी रुपये) कर्ज आहे.
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी मेस्सी बार्सिलोना क्लबमध्ये सामील झाला. चार वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर, अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूने 2004 साली बार्सिलोनाच्या वरिष्ठ क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. मेस्सीने अखेर बार्सिलोनासोबत 2017 मध्ये 555 दशलक्ष युरो (सुमारे 4910 कोटी रुपये) साठी करार केला. क्रीडा इतिहासातील हा सर्वात मोठा करार होता. त्याला एका हंगामासाठी 138 दशलक्ष युरो (सुमारे 1220 कोटी रुपये) मिळायचे.
लिओनेल मेस्सीने 17 वर्षात बार्सिलोनासह 35 विजेतेपद मिळवले आहेत. त्याने क्लबसाठी 778 सामन्यात विक्रमी 672 गोल केले आहेत. मेस्सीने स्पॅनिश लीगमध्ये 520 सामन्यांत 474 गोल केले आहेत. तसेच, एका क्लबसोबत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. सर्वाधिक सहा वेळा बेलेन डी’ओर जिंकणारा खेळाडू मेस्सी आहे. त्याने अर्जेंटिनासाठी 76 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नाही म्हणून असंतोष निर्माण करू नका; हवं तर मराठा आरक्षणाचे श्रेय देखील घ्या पण…’
- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी अखेर निधी उपलब्ध !
- मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील
- कसोटीत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर पाचव्यांदा बाद; जाणून घ्या आधीचे रेकॉर्ड्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

