🕒 1 min read
मुंबई : शहरांच्या नावांच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. हा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. मात्र तत्पूर्वीच गुगल मॅप ॲपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’, असे दाखवत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयाला एमआयएम पक्षाने आणि काही संघटनांनी सुद्धा विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात एमआयएमने आणि इतर संघटनांनी औरंगाबादमध्ये मोर्चा सुद्धा काढला होता. असाच आणखी एक मोर्चा १२ तारखेलाही काढण्यात येणार आहे. असे असतानाच आता काही वेळापासून गुगल मॅपवर औरंगाबाद असे शोधले असता मराठीत औरंगाबाद तर इंग्रजीत ‘संभाजीनगर’ आणि मराठीत उस्मानाबाद तर इंग्रजीत ‘धाराशिव’ असा उल्लेख आढळून येत आहे. याचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Can @Google please explain on what basis have you changed the name of my city Aurangabad in your map! You owe an explanation to the millions of citizens with whom this mischief has been played. pic.twitter.com/yB2r2VFjlz
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) July 19, 2022
गुगल मॅपने केलेल्या या नामांतरामुळे आता खासदार इम्तियाझ जलील यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. “गुगल, कशाच्या जोरावर तुम्ही माझ्या शहराचे औरंगाबादचे नाव बदलले आहे? तुम्हाला लाखो लोकांना या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल”, असे जलील त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- BJP MLA Shweta Mahale : आमदारांच्या आर्थिक फसवणूकीसंदर्भात श्वेता महाले यांच स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे…”; उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
- NCP : ‘सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे’; राष्ट्रवादीचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Shivsena MP | राहुल शेवाळेंवर महिलेचा बलात्काराचा आरोप, CM शिंदेंना पत्र लिहून मागितला न्याय
- Ramdas Kadam : बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं; रामदास कदम स्पष्टच बोलले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
