🕒 1 min read
Ravikant Varpe । मुंबई : माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र कदम यांच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीतून प्रत्युत्तर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शरद पवार व अजितदादा पवारांवर शिवसेना फोडीचे बेछूट आरोप केले. रामदास कदमांनी हे लक्षात घेतले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या मागे जी महाशक्ती उभी आहे त्या महाशक्तीने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडला आहे, त्याच महाशक्ती पुढे तुम्ही लोटांगण घालणार आहात, असा वर्पे यांनी केला आहे.
तसेच पुढे आज तुमच्यासारखे जुने शिवसैनिक ज्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं मंत्रीपदे दिली. परंतु शिवसेना सोडण्यासाठी तुमच्याकडे काही कारण नसल्याने असे बेछूट आरोप पवारसाहेब व अजितदादांवर करत आहात. परंतु सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असं रविकांत वरपे यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena MP | राहुल शेवाळेंवर महिलेचा बलात्काराचा आरोप, CM शिंदेंना पत्र लिहून मागितला न्याय
- Ramdas Kadam : बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं; रामदास कदम स्पष्टच बोलले
- Bisexual couple’s love story । ‘सरहद’ ना प्यार को रोके; अंजली आणि सुफीची अजब लव्हस्टोरी
- Arvind Sawant : “हे सर्व उद्धव ठाकरे यांना झुकवायला निघालेत, पण…”; अरविंद सावंत यांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Shivsena MP | अखेर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात! पहिला PHOTO आला समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
