Share

Ramdas Kadam : बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं; रामदास कदम स्पष्टच बोलले

Published On: 

🕒 1 min read

Ramdas kadam । मुंबई : आज सकाळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसेच यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फ़ोट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. तसेच त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

पक्षाच्या विचारसरणीत मोठा बदल होत असून महाविकास आघाडीबरोबर अनैसर्गिक युती केल्याने तर पक्षाला हिंदुत्वाचा विसर पडतो की असा सवालही बंडखोर आमदरांनी उपस्थित केला आहे. हे सर्व होत असताना मात्र, रामदास कदम यांनी बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं असे विधान केले आहे. ज्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या सोबत बसून मिळालेले मुख्यमंत्रीपद देखील बाळासाहेब ठाकरे यांना मान्य झालं नसते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊच दिले नसते असे कदमांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर किती टीका केली गेली, खालच्या पातळीवर जाऊन बोललं गेलं. त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवा, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच “माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोललं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं”, असे देखील रामदास कदम यांनी आज म्हंटल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!