Share

Uddhav Thackeray | “भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे…”; उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करत शिवसेनेला सुरुंग लावला आणि भाजप पक्षाशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. सुरुवातीला केवळ ४० आमदार घेऊन गेलेल्या शिंदेंना, नंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांनी संख्या दिवसेंदिवस कमीच होत आहे. त्यामुळेच आगामी निवडणूका लक्षात घेऊन आता स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीय एकता मंचासोबत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी भाजपवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. बंडखोर आमदारांनी शिवसेना संपवली, राष्ट्रवादी पक्ष शिवसेना संपवायचा प्रयत्न करत आहे, असे आरोप अनेक वेळा करण्यात आलेत. या सगळ्या आरोपांवर प्रत्युत्तर देत ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेमध्ये फूट बंडखोर आमदारांनी नाही, तर भाजपने पाडली. भाजपच शिवसेना संपवत आहे. भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातला एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला ते तुरुंगात टाकतील.”

भाजपवर निशाणा साधत असताना, “तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या. पण धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा”, असा इशाराही ठाकरेंनी दिला. तसेच या बैठकीत उत्तर भारतीय एकता मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक तिवारी यांनी ५० हजार ऍफिडेव्हिट देऊन आम्ही उद्धव ठाकरे यांना समर्थन देणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊन भाजपनेच शिवसेनेत फूट पाडल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!