मुंबई : शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यातून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. यानंतर भाजप आणि शिवसेनेत प्रचंड वितुष्ट निर्माण झाले. दोन्ही पक्षामध्ये आता दररोज लढाई होताना दिसून येते. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांवर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. यामुळे भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर यांनी घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीत ठाकरे म्हणाले, “मोदींशी आमचं नातं काय होतं? आजही जाहीर सांगतो. मोदींचं नाव घेताना मी त्यांना नरेंद्र भाई म्हणतो. माझ्या मनात आजही त्यांचं बद्दल प्रेम आणि आदर आहे. व्यक्ती म्हणून नक्कीच आदर आहे. आमचं नातं आहे म्हणायचं का होतं म्हणायचं, हे दोन्हीकडून ठरवलं पाहिजे. माझ्याकडून आहे, पण याचा अर्थ लगेच युती होईल का ? तर असं नाही. मी व्यक्तिगत सांगतो, आमच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही कुठेतरी ओलावा आहे. तीच आपली संकृती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यामुळे आता शिवसेनेसोबत पुन्हा एकदा भाजपची युती शक्य आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींची केलेली स्तुती आणि मोदींसोबत आजही असलेलं भावनिक नातं यामुळे भाजप शिवसेना युतीचा धागा जुळेल का ? याबाबत चर्चा होत आहेत. युतीची शक्यता पुन्हा एकदा वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

