🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) आले आहे. आज रविवारी (१ मे) रंगणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी रवींद्र जडेजाने आपले कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवले. या मोठ्या घडामोडीनंतर क्रिकेटविश्वातून अनेक प्रतिक्रिया आल्या. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही यावर मत दिले.
क्रिकबझवरील संवादादरम्यान सेहवागने जडेजाच्या कर्णधारपद सोडण्याबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, ”आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत की जर महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसेल, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ यशस्वी होणार नाही. अलीकडे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. आता अर्धे सामने बाकी असल्याने त्यांना पुनरागमनाची संधी आहे.”
Thala is back ????#Epic #MSDhoni #CSK #CaptainCool #Yellove #TATAIPL pic.twitter.com/1TGCJlS6yh
— Star Sports (@StarSportsIndia) April 30, 2022
याआधी अजय जडेजानेही धोनी पुन्हा कर्णधार झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती. ”एमएस धोनी संघात असेल तर तो कर्णधार असावा. आता प्रत्येकजण आनंदी आहे आणि मला विश्वास आहे, की रवींद्र जडेजावरचा खूप मोठा भार उचलला गेला असावा. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळता, तेव्हा त्याच्यासमोर कर्णधार बनणे खूप कठीण होऊन बसते”, असे जडेजाने म्हटले.
आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते आणि त्याच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी चांगली झाली नाही. संघाने ८ पैकी ६ सामने गमावले आणि फक्त २ सामने जिंकले. त्याचवेळी रवींद्र जडेजाची कामगिरी चांगली नव्हती. कदाचित याच कारणामुळे त्याने कर्णधारपद सोडले आणि आता पुन्हा एकदा धोनीकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
