Share

रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफत लस…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ केला. शहरात आजवर ११ हजार १८१ अधिकारी-कर्मचार्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस सोमवारी (दि. १५) पासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, देशातील सरकारी रुग्णालयात कोरोना लसीकरण मोफत होईल असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र आता खाजगी रुग्णालयातून करण्यात येणाऱ्या लसीकरण या संदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, कोरोना लसीकरण खासगी रुग्णालयात प्रति व्यक्ती प्रति 250 रुपये द्यावे लागतील.

मात्र रिलायन्स समुहामध्ये काम करणाऱ्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोन लस घेण्यासाठी पैसे द्यावे लागाणार नाही कारण रिलायन्स समुहाकडून कर्मचाऱ्यांच्या कोरोना व्हॅक्सिनेशनचा सर्व खर्च उचलला जाणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे.

नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी अशीही माहिती दिली की कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांची पत्नी किंवा पती, आई-वडील आणि लस घेण्यास पात्र असणारी मुलं यांच्या देखील लसीकरणाचा खर्च कंपनी करणार आहे. रिलायन्स समुहामध्ये साधारण 6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय मिळून ही आकडेवारी 1.9 मिलियनच्या घरात जाते. या सर्वांचा कोरोना लशीचा खर्च रिलायन्स समुहाकडून करण्यात येणार आहे.

नीता अंबानी यांनी या मेलमध्ये असेही म्हटले आहे, ‘याआधी रिलायन्स फॅमिली डे 2020 च्या मेसेजमध्ये, मुकेश आणि मी दोघांनीही खात्री दिली होती की COVID-19 लशीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रिलायन्स कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस मिळावी याकरता आम्ही खास योजना आखू. आम्ही त्या ध्येयाशी बांधिल आहोत.’ कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पुढे म्हणाल्या की, आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि आनंदाची कदर करणे म्हणजेच एखाद्या कुटुंबाचा-रिलायन्स कुटुंबाचा भाग असणे आहे.

नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, ‘तुमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या पँडेमिकला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवला पाहिजे आणि आपण जिंकू. या मेलच्या शेवटी नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना विश्वास देण्यासाठी ‘कोरोना हारेगा, इंडिया जितेगा’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!