मुंबई: कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमवला. तर दुसऱ्या लाटेतही अनेक अडचणींचा कोरोना रुग्णांना सामना कराव लागला. मात्र आता पहिल्यांदाच महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०२२० पासून राज्यात एकही कोविड मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.
“१ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच राज्यात एकही कोव्हीड मृत्यू झालेला नाही. राज्यातील ११ कोटी जनतेच्या साथ व सहकार्याने आपण कोरोनाविरद्धच्या या लढाईत संपूर्ण विजय मिळवू, असा मला विश्वास आहे.”, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी !
१ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच आज राज्यात एकही कोव्हीड मृत्यू झालेला नाही. राज्यातील ११ कोटी जनतेच्या साथ व सहकार्याने आपण कोरोनाविरद्धच्या या लढाईत संपूर्ण विजय मिळवू, असा मला विश्वास आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 2, 2022
दरम्यान कोरोना संक्रमणाचा स्तरही आता कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंधातही बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये तसेच इतर संस्था सुरु करण्यात आल्या आहेत. दैनंदिन जीवन पुन्हा एकदा रुळावर येत आहे. त्यात ही बातमी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
बीसीसीआयद्वारे यावर्षीचे करार जाहीर; पुजारा आणि रहाणेची ‘B’ ग्रेडमध्ये घसरण
- GOOGLE मध्ये मोठ्या प्रमाणात जॉब ओपनिंग; फ्रेशर्सला सुद्धा संधी
- Russia Ukraine War: भारतालाही मिळाली होती अणूहल्ल्याची धमकी ; परंतु वाजपेयींच्या ‘एका’ विधानाने पाकिस्तानचा डाव पुरता फसला
- Russia Ukraine War: आता भारतीय रेल्वेही मैदानात ; युक्रेनहून परत येणाऱ्या लोकांसाठी केली ‘ही’ खास सेवा सुरु
- नवी नियमावली जारी; लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट कायम


