नवी दिल्ली : १९४७ यावर्षी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले होते. १४ आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशी अनुक्रमे पाकिस्तान आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पाकिस्तान हा देश नेहमीच भारताचा द्वेष करत आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात आत्तापर्यंत ४ वेळा युद्ध झाली आहेत आणि या चारही युद्धात भारताचाच विजय झाला आहे. १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ या चारही युद्धात भारताचा विजय झाला आहे.
सध्या जगात युक्रेन आणि रशिया या दोन युरोपीय देशांमध्ये युद्ध चालू आहे. नुकतेच रशियाने आमच्या नादी जगातील कोणताही देश लागला तर आम्ही अण्वस्त्र हल्ला करू असा सज्जड इशारा दिला आहे. याचमुळे आता अणुयुद्धाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. भारतावर सुद्धा एका देशाने अणुहल्ला करायची धमकी दिली होती. परंतु वाजपेयींच्या ‘एका’ विधानाने ‘तो’ डाव पुरता फसला होता.
काय आहे नेमके प्रकरण
१९९९ च्या जून आणि जुलै महिन्यात पाकिस्तानी आक्रमकांनी काश्मीर खोऱ्याजवळील टेकड्यांवर आक्रमण केले होते. भारतीय लष्कराने सुद्धा या आक्रमणाला तोडीसतोड उत्तर दिले होते. हेच ते इतिहासातील प्रसिद्ध कारगिलचे युद्ध होय .नवाज शरीफ आणि पाकिस्तान आर्मीचे तेव्हाचे प्रमुख जनरल परवेझ मुशरफ यांनी भारतावर आक्रमण करायचा प्लॅन केला होता. त्याला तेव्हाच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने तोडीसतोड उत्तर दिले. भारतीय लष्कराने जेव्हा जोरदार प्रत्युत्तर दिले ; तेव्हा पाकिस्तानी लष्कराची पळताभुई थोडी झाली. भारतीय लष्करासमोर पाकिस्तानी लष्कराचा निभाव लागणे अवघड वाटत होते. आपला भारतीय लष्करासमोर काही निभाव लागणार नाही , आपण हारत चालले आहोत या भयाने पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्र हल्याचा प्लॅन आखला होता. आपण जर कारगिल युद्ध हारत आलो ; तर आपण युद्ध संपायच्या शेवटच्या क्षणी भारतावर अण्वस्त्र हल्ला करूया असा तेव्हाचे पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाझ शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख परवेझ मुशरफ या दोघांचा प्लॅन होता. पाकिस्तान भारतावर कुठल्याही क्षणी अण्वस्त्र हल्ला करू शकत ही माहिती अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना समजली. पाकिस्तान कोणत्याही क्षणी भारतावर अण्वस्त्र हल्ला करू शकतो ही माहिती जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना समजली ; तेव्हा त्यांनी त्वरित भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संपर्क साधला.
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संपर्क साधून पाकिस्तान कोणत्याही क्षणी भारतावर अण्वस्त्र हल्ला करू शकत अशी माहिती बिल क्लिंटन यांनी दिली. त्यावर हसत हसत अटल बिहारी वाजपेयी म्हणाले कि, पाकिस्तानने भारतावर अण्वस्त्र हल्ला केल्यास उद्याचा ‘ सूर्योदय पाकिस्तान पाहूच शकणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. अटल बिहारी वाजपेयी यांचे हे वाक्य जेव्हा पाकिस्तानला समजले तेव्हा त्यांनी भारतावर अण्वस्त्र हल्ला करायचा विचार सोडून दिला.
महत्वाच्या बातम्या :
- ‘…जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल’; अतुल लोंढेंचा फडणवीसांना टोला
- सोमय्यांच्या तोंडाला झाकण राहिलेले नाही; विजय वडेट्टीवार यांची टीका
- कॉर्डेलिया क्रूझशिप ड्रगमध्ये आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचा अहवाल एनसीबीने फेटाळला
- श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात जोडला गेला ‘हा’ फिरकी गोलंदाज
- ‘उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या सरकारवर कंट्रोल नाही’ – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
