🕒 1 min read
मुंबई: सध्या युरोप खंडात रशिया विरुद्ध युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आहे. या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगातील अनेक देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत देश सुद्धा याला अपवाद नाही.
भारत देशातून दरवर्षी अनेक विद्यार्थी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षण घ्यायला जात असतात. युक्रेन आणि रशियामधील या युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थी तिथे अडकले आहेत. या भारतीय विद्यर्थ्यांना परत मायदेशी सुरक्षित रित्या आणण्यासाठी भारत सरकारने ‘ ऑपरेशन गंगा’ हा उपक्रम सुरु केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भारत सरकारचे ४ मंत्री ऑपरेशन गंगाला मदतीसाठी युक्रेनशेजारील देशात गेले आहेत. कालच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारतीय हवाईदल मैदानात उतरले आहे.
त्यातच आज भारतीय रेल्वेने सुद्धा युक्रेनमधून भारतात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास सेवा सुरु केली आहे. युक्रेनमधून भारतात येणारे विद्यार्थी मुंबई आणि दिल्ली या दोन शहरात उतरतात. त्यांना आता त्यांच्या त्यांच्या शहरात/ राज्यात पोहचण्यासाठी सरकारकडून सोय केली जात आहे. भारतीय रेल्वेने मुंबईमध्ये उतरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी रिझर्व्हेशन आणि मदत डेस्क सुरू केला आहे. भारतीय रेल्वेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुवीधा सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील या विमानतळावरील टर्मिनल २ वरील गेट क्रमांक ४ लेव्हल पी ४ वर ही भारतीय रेल्वेची खास सुविधा उपलब्ध होणार आहे. युक्रेनवरून आलेल्या भारतीयांना धीर देणे तसेच त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जायला प्रवासाची सोय उपलब्ध करून देणे हे या भारतीय रेल्वे डेस्कचे मुख्य काम असणार आहे. याबाबत भारतीय रेल्वेने ट्विट करत माहिती देखील दिली आहे.
Indian Railways has opened Reservation cum Help Desk for the stranded students/passengers arriving from special flight from Ukraine near Gate No. 4 at Level P4 of Terminal 2 of CSIA, Mumbai. #OperationGanga @RailMinIndia @Central_Railway pic.twitter.com/zOclaoLJBr
— Western Railway (@WesternRly) March 2, 2022
महत्वाच्या बातम्या :
- नवी नियमावली जारी; लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट कायम
- उर्जामंत्र्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार करावा, खर्च आम्ही करू – अशोक सोनोने
- क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस आठवतोय का? पाकिस्तानात 13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी…
- ‘कापूस ते कापड’ उपक्रम रखडला; उपक्रम लांबणीवर राहिला ,कारण…
- आता शेतमालाला मिळणार योग्य दर्जाचा दर! ‘ही’ नवीन योजना उपलब्ध..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
