🕒 1 min read
मुंबई : बीसीसीआयने नुकतेच भारतीय खेळाडूंचे नवीन करार जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांच्या श्रेणीही ठरवण्यात आल्या आहेत. ज्यात भारताचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि माजी कसोटी उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांची बीसीसीआयच्या ताज्या केंद्रीय करार यादीच्या श्रेणीत घसरण करण्यात आली आहे. BCCI च्या चार श्रेणी आहेत , A + ज्यांचे वार्षिक मानधन ७ कोटी रुपये आहे तर A, B आणि C श्रेणींचे मूल्य अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये आहे. गेल्या वेळी २८ क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देण्यात आला होता, परंतु यावर्षी २७ जणांना रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह A करार देण्यात आला आहे.
बीसीसीयायच्या (BCCI) नव्या करारानुसार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara), अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि इशांत शर्मा, जे A श्रेणीत होते ते आता B श्रेणीत आहेत, खराब फॉर्ममुळे त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी घरच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यांच्या करारात यावर्षी घसरण होईल हे आधीच वृत्तात जाहीर झाले होते. A गटात आधी १० खेळाडूंचा समावेश होता, तो आता पाचवर घसरला असून रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.
करारात सर्वात धक्कादायक म्हणजे भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांना A श्रेणीतून C मध्ये टाकण्यात आले आहे. याआधीच्या गटातील फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना यादीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. भारतीय संघात स्थान अनिश्चित असलेल्या मयंक अग्रवालची आता B गटातून C मध्ये पाठवण्यात आले आहे. यात केवळ मोहम्मद सिराजला चांगल्या कामगिरीमुळे C मधून B गटात स्थान मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA ) नावाने फसवणूक
- GOOGLE मध्ये मोठ्या प्रमाणात जॉब ओपनिंग; फ्रेशर्सला सुद्धा संधी
- Russia Ukraine War: भारतालाही मिळाली होती अणूहल्ल्याची धमकी ; परंतु वाजपेयींच्या ‘एका’ विधानाने पाकिस्तानचा डाव पुरता फसला
- Russia Ukraine War: आता भारतीय रेल्वेही मैदानात ; युक्रेनहून परत येणाऱ्या लोकांसाठी केली ‘ही’ खास सेवा सुरु
- नवी नियमावली जारी; लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट कायम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
