औरंगाबाद : प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अंतर्गत आणखी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यात विजयवाडा-शिर्डी या रेल्वेचा देखील समावेश असल्याची माहिती नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
विजयवाडा ते शिर्डी साप्ताहिक रेल्वे ७ एप्रिलपासून सोडण्यात येणार असून दर मंगळवारी ही रेल्वे धावेल.
विजयवाडा येथून ही रेल्वे सकाळी १० वाजून १५ मिनिटाने सुटेल आणि सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे साईनगर शिर्डी येथे रात्री ७ वाजून १० मिनिटाने पोहोचेल. पुढील आदेश प्राप्त येईपर्यंत ही रेल्वे सोडण्यात येणार आहे. तसेच साई नगर शिर्डी ते विजयवाडा साप्ताहिक रेल्वे दर बुधवारी साईनगर शिर्डी येथून सायंकाळी ५ वाजून २० मिनिटाने सुटेल.
ही रेल्वे मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद, काझीपेत मार्गे विजयवाडा येथे दुपारी ३ वाजून १५ मिनिटाने पोहोचेल. ही रेल्वे देखील ७ एप्रिल पासून सोडण्यात येणार आहे. आंबेडकर नगर-येशवंतपूर ही रेल्वे २८ फेब्रुवारीपासून सोडण्यात येणार आहे.
ही रेल्वे इंदोर, उज्जैन, भोपाल, अकोला, वाशीम, पूर्णा, नांदेड, काचीगुडा, धर्मावर डॉक्टर आंबेडकर नगर मार्गे रात्री ८ येशवंतपूर येथे १० वाजून ५० मिनिटाने पोहोचेल. तसेच येशवंतपूर ते आंबेडकरनगर साप्ताहिक रेल्वे दर मंगळवारी सोडण्यात येईल. ही रेल्वे यशवंतपूर मार्गे धर्मावरम, काचीगुडा, नांदेड, पूर्णा, वाशीम, अकोला, भोपाल, उज्जैन, इंदोर धावेल.
यशवंतपूर येथून दुपारी ३ वाजून ५० मिनिटाने सुटेल आंबेडकर नगर येथे रात्री ७ वाजून १५ मिनिटाने पोहोचेल. ही रेल्वे २ मार्च पासून सोडण्यात येणार आहे. दोन्ही रेल्वे आरक्षित असल्याने अनारक्षित प्रवाशांना रेल्वेत प्रवास करता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शहराची निवडणूक ‘ऐतिहासिक’ करण्याचा भाजपचा प्रयत्न
- चित्राताई या वाघिण आहेत त्या घाबरणार नाहीत : चंद्रकांत पाटील
- पुजा चव्हाणसाठी फुलंब्रीत भाजपा रस्त्यावर
- परभणीत उभारणार मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज
- काँग्रेसमध्ये धुसफुस पुन्हा वाढली; २३ नाराज नेते आज जम्मूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

