Share

काँग्रेसमध्ये धुसफुस पुन्हा वाढली; २३ नाराज नेते आज जम्मूत

Published On: 

जम्मू- काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून देण्यात आलेला निरोप आणि खासदार राहुल गांधींनी केलेल्या  ‘उत्तर-दक्षिण’ बाबतच्या विधानाच्या या पार्श्वभूमीवर आज पक्षाचे वरिष्ठ नेते जम्मूत एकत्र येत आहेत.यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या समोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर-दक्षिण भारतीयांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाराज आहेत.यावरूनच सध्या राजकारण तापत असल्याचे दिसत आहे. यातूनच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांची जम्मूत आज बैठक होत आहे.या शक्तीप्रदर्शासाठी गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि राज बब्बर हे उत्तर भारतीय नेते जम्मूमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर हरियणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि मनिष तिवारी देखील जम्मूत येणार आहेत.

जम्मू हे गुलाम नबी आझाद यांचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे नाराज नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी हे अगदी योग्य शहर मानले जात आहे.दुसरीकडे राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी तमिळनाडूत आहेत. राहुल देशाच्या एका टोकाला असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते देशाच्या दुसऱ्या टोकाला एकत्र येणार आहेत. हे नेते पक्ष नेतृत्वाला आणि गांधी घराण्याला चेतावणी देऊ शकतात असं देखील काही लोकांचे म्हणणे आहे.

काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा मुख्य रोष राहुल गांधी यांच्यावर आहे, अशी माहितीही समोर आली आहे. काँग्रेसमध्ये सध्या जे काही घडतंय ते गेल्या वर्षी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या कराराचं उल्लंघन आहे, असा या नेत्यांचा दावा आहे. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारत एक आहे, असंही या नेत्यांना या बैठकीतून राहुल गांधी यांना दाखवून द्यायचे आहे.

जम्मू-काश्मीर कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, जम्मूमधील पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान आझाद यांनी हे स्पष्ट केले की आपण कॉंग्रेस सोडणार नाही आणि भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!