मुंबई : भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात रान पेटवले होते. मात्र, आता त्यांच्याच पतीवर गुन्हा दाखल झाल्याने चित्र वाघ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशी शंका निर्माण होत आहे.
संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे . याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषेद घेतली. यावेळी ते म्हणाले कि, “गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबधित गुन्हे दाखल होत आहेत, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत, पूजा चव्हाण आत्महत्या की हत्या या बाबत अजून ही खुलासा होत नाही.
चित्रा वाघ यांना आताच कसा त्रास द्यायला सुरुवात होतो, अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर कारवाई का नाही, चित्राताई वाघिणी सारख्या त्या घाबरणार नाहीत, चौकशीची भीती दाखवून त्यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नाही.” असे ते म्हणाले.
दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तेही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारविरोधात हल्लाबोल करत असतानाच. पतीवर गुन्हा दाखल झाल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये धुसफुस पुन्हा वाढली; २३ नाराज नेते आज जम्मूत
- लैंगिक शक्ती वाढविण्याच्या लालसेतून ‘या’ राज्यात लोकं खात आहेत गाढवाचे मांस
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
- क्या बात है…. सोलापुरात 18 तासात बांधला 25 किमीचा रस्ता, गडकरींनीही केले तोंडभरून कौतुक
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा


