औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने आपल्या १३०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनएसडीएल) लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. आस्थापना, विधी आणि लेखा विभागाचा अभिप्राय घेऊन यासंबंधीच्या संचिकेस पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची मान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत कार्यरत झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी परिभाषित पेन्शन योजना लागू केली आहे. या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून परस्पर रक्कम कपात केली जाते. त्यातून सेवानिवृत्त होताना कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. मात्र आजवर पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही पेन्शन योजना लागू नव्हती. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नसल्यामुळे वृध्दापकाळात कर्मचाऱ्यांची परवड होवू नये, याकरिता पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यासाठी पूणे येथील एनएसडीएल या संस्थेसोबत करार केला आहे.
या संस्थेचे समन्वयक दिपक मराठे यांच्याशी मुख्य लेखापरिक्षक डॉ. देविदास हिवाळे यांनी चर्चा केली. त्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यासाठी आस्थापना, विधी, लेखा विभागाचा अभिप्राय घेऊन प्रशासक तथा आयुक्त पांडेय यांची संचिकेला मंजूरी घेण्यात येईल. त्यानंतर ही योजना लागू होण्यास दोन महिने लागतील, असे सुत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- एलआयसीच्या खासगीकरणामध्ये पॉलिसीधारकांना मिळणार मालक होण्याची संधी !
- माजी आ.हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
- एल्गार परिषदेत गरळ ओकणारा शरजील उस्मानी नक्की आहे तरी कोण ?
- भाजपच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरूच; ‘उद्धव ठाकरे आपडा’नंतर ‘रासगरबा’
- धोनीच्या शेतातील भाजी विकणारी गोंडस भाजीवाली झीवा ! पहा व्हिडीओ…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

