नवी दिल्ली : क्रिकेटच्या नियमांमध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजासाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
यापूर्वी असा नियम होता की, जर एखाद्या फलंदजाने मोठा फटका मारला आणि तो झेलबाद झाला. तेव्हा पंचांना नियम पाहून पुढचा खेळ सुरु करावा लागत होता. म्हणजेच जर एखादा खेळाडू झेल बाद झाला आणि त्याचवेळी जर दोन्ही फलंदजांना एकमेकांना क्रॉस झाले तर नॉन स्टाइकचा फलंदाज हा खेळण्यासाठी सज्ज व्हायचा. त्याचवेळी नवीन येणारा फलंदाज हा नॉन स्ट्राइकला जायचा आणि त्याला थेट फलंदाजी करण्याची संधी मिळायची नाही.
पण आता क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या नियमांनुसार जर एखादा खेळाडू झेल बाद झाला तर नवीन येणारा खेळाडू हा थेट फलंदाजीला जाणार आहे. त्यामुळे मैदानात आल्यावर लगेचच नवीन फलंदजाला चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. पण जर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर मात्र नॉन स्ट्राइकला असणारा खेळाडू हा फलंदाजीला जाणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या द हंड्रेड या स्पर्धेत हा नियम लागू केला होता.
त्याचबरोबर अजून काही महत्वाचे बदल यावेळी करण्यात आले आहेत. करोनामुळे थुंकी वापरण्यास बंदी घातल्याने खेळाडू घामाचा वापर चेंडू चमकावण्यासाठी करत होते. आणि त्याचा देखील तितकाच प्रभाव पडत होता. नव्या नियमानुसार आत चेंडूला थुंकी लावता येणार नाही. कारण चेंडूवर थुंकी लावण्यासाठी खेळाडू साखरेच्या काही पदार्थांचा वापर करत असत. यामुळे चेंडूवर थुंकी लावणे म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये बदल केल्याचे होईल.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

