Share

भारत, पाकिस्तान ऑस्ट्रेलियात भिडणार?…पहा ऑस्ट्रेलिया बोर्ड काय म्हणालेय

Published On: 

🕒 1 min read

 

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे शेजारी आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांशी भिडतात. पण आता लवकरच हे दोन देश तिरंगी मालिकेत एकमेकांशी दोन हात करताना पाहायला मिळतील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाचे प्रमुख निक हॉकले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. हॉकले यांनी बुधवारी ९ मार्च ला भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी मालिका आयोजित करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख हॉकले म्हणाले की, “येत्या काळात भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया अशी तिरंगी मालिका आयोजित करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तत्पूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये झाली होती. आता हे दोन्ही संघ तिरंगी मालिकेत आमने-सामने आले तर क्रिकेट चाहत्यांसाठी खूप उत्साहाचे ठरेल.

हॉकले पुढे म्हणाले की, ‘मला तिरंगी मालिका आवडते. याआधीही अशा मालिकेला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आम्ही अशा मालिका आयोजित करण्याच्या बाजूने आहोत. ऑस्ट्रेलियात भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लाखो लोक राहतात. भारत-पाकिस्तानमधील सामना जगभरातील अनेक चाहत्यांना पाहायचा आहे.”

जानेवारी महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही चार देशांची मालिका भरविण्याबाबतची इच्छा व्यक्त केली होती. रमीझ राजा म्हणाले होते की, “भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार देशांची मालिका आयोजित करण्यासाठी आम्ही इच्छुक आहेत. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हॉकले यांनीही तिरंगी मालिकेबद्दल मत व्यक्त केले.”

सध्या भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची तिरंगी मालिका होणे कठीण दिसत आहे. कारण २०२३ पर्यंतचा भारतीय संघाचा कार्यक्रम ठरलेला आहे. पण जर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने यामध्ये जास्त रस घेतला तर नक्कीच ही मालिका होऊ शकते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ बीसीसीआय आणि पीसीबी यांच्याशी कशी आणि कधी चर्चा करते, यावर या तिरंगी मालिकेचे भवितव्य अवलंबून असेल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!