मुंबई : कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. मच्छिमारी क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला. अशातच गेले २ वर्षे आलेल्या चक्रीवादळाचा देखील मच्छिमारांना फटका बसला. कोरोनामुळे मागणी घटली आणि त्याचा परिणाम किंमतीवर झाला. भाव जरी घसरला असला तरी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्यामध्ये असलेला धोका मात्र कायम आहे.
मच्छिमाऱ्यांसाठी रोजचा दिवस हा सारखा नसतो. कधी, किती मासे जाळयात अडकून कमाई होईल याबाबत अनिश्चितता असते. दरम्यान, पालघर तालुक्यातील एका मच्छिमाऱ्याचे नशीब पालटले आहे. देव देतो तेव्हा छप्पर तोड देतो याची अनुभूती मुरबे गावातील हरबा देवी बोटीचे मालक चंद्रकांत तरे यांना आली आहे.
त्यांच्या बोटीच्या ‘वागरा’ जाळ्यात तब्बल दीडशेहुन अधिक घोळ जातीचे मासे लागले आहेत. एका माश्याचे वजन साधारणपणे 18 ते 25 किलो आहे. मासे आणि माश्यात आढळणाऱ्या पिशवीच्या (बोत)विक्रीतून मच्छिमाराला तब्बल दीड कोटी रुपयांची कमाई होणार आहे.
मच्छिमार चंद्रकांत तरे त्यांच्या हरबा देवी नामक छोट्या बोटीने मुरबे बंदरातून समुद्रात 15 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करीत असताना समुद्रात लावलेले ‘वागरा’जाळे जड झाल्याचे बोटीवरील कामगारांना जाणवले. यानंतर जाळे ओढून बोटीत घेतल्यानंतर जाळ्यात दीडशे हुन अधिक घोळ मासे आढळून आले. एक मासा साधारणपणे 18 ते 25 किलो वजनाचा आहे. एका माश्यातून 700 ग्रॅम ते एक किलो ग्रॅमची पर्यंत पिशवी (बोत) मिळण्याची शक्यता असते. या पिशवीचा (बोत)वापर औषधी वापर केला जात असल्याने चांगला भाव मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रामाची नियत खराब होती जयकुमार गोरेची चांगली आहे’ ; भाजप आमदारचे वादग्रस्त विधान
- ‘राज्याला बंदिवान केल्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर’, भाजपचा टोला
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोर फेरीवाल्याला प्रसाद देणार’ ; अविनाश जाधव आक्रमक


