Share

‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात संबोधित करताना लसीकरण मोहिमेबाबत भाष्य करताना महत्वाचं विधान केलं आहे. ‘कोरोनावर चार लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या तर देशात लसीकरण शक्य झालं नसतं. अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘कोरोना लसीवरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करणे गरजेचं आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसंकत्व येतं, असे संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, आता लसीचा प्रभाव लोकांच्या लक्षात आला आहे,’ असं देखील फडणवीस यांनी नमूद केलं.

दरम्यान, ‘ कोरोनाशी आपण सर्वच संघर्ष करत आहोत. त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजही दिले आहे. परंतु, भारतासारख्या महाकाय देशात लसीकरण मोहीम राबवणं हे कठिण काम होतं. आज आपण आपल्या देशात चार लसी तयार केल्या. त्या केल्या नसत्या तर अमेरिका आणि ब्रिटनने आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ असं आपल्याला सांगितलं असतं. त्यामुळे आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!