सातारा : भाजपचे माण खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे आता चांगलेच वादाच्या भोवर्यात सापडलेले आहेत. तसेच प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तीचे दाखले देवून सातत्याने विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपला देखील त्यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आणले आहे.
साताऱ्यातील वडूज परिसरातील सातेवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सदाशिव खाडे, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकीय जय पराजयाबाबत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी रामायणातील दाखला दिला होता.
याच पार्श्वभूमीवर बोलताना गोरे म्हणाले कि, ‘लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा. त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो, असे सांगून आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे.
भगवान श्रीरामांची नीयत खराब होती….
– भाजपा आमदार जयकुमार गोरे
बघा प्रभू रामाचे पण उपकार फेडले यांनी
???????????? pic.twitter.com/Fe0HhOHYVi— SUSHIL (@SUSHIL88888) September 1, 2021
कारण रामाची नियत खराब होती. रामाची नियत खराब होती.’ आमदार गोरे असे दोन वेळा म्हणताच झालेली चूक श्रोत्यांनी त्यांच्या लक्षात आणून देत रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती, असा गलका श्रोत्यांनी करताच गोरेंनी रावणाची नियत खराब होती, अशी चुकीची दुरुस्ती केली. परंतु आता जयकुमार गोरेंकडून हि चूक अनवधानाने झाली असली तरी आता त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तर विरोधकांकडून देखील त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

