Share

नववा महिना लागला का? ; सदाभाऊंचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर खोचक वार

Published On: 

नाशिक : शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जिव्हारी लागेल अशी टिप्पणी केली होती. “शिवसेनेला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्या सर्वांना संपवत शिवसेना पुढे जात राहिली,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला होता. आता यावर शेतकरी नेते व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मला वाटतं की मुख्यमंत्री हे भगव्यातून आता हिरव्यात आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न बाळगलेले होते, त्या स्वप्नाचा चक्काचूर करण्याचे काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात जनतेला हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत दिलेले होतं, पण विश्वास घात करून ते सत्तेवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या बोलवता धनी हा बारामतीला आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

“मुख्यमंत्री नामदार सारखे नामदारी आहेत आणि जसे एखादं बियाणे पेरल्यानंतर उगवतं नसतं तसे मुख्यमंत्री काही बोलले तर त्याला पीक येत नाही. त्यांच्या बोलण्याला काही सुद्धा अर्थ नाही. राज ठाकरे जेव्हा लाव रे ते व्हिडिओ म्हणायचे तेव्हा, यांना हसू यायचं. आता ते गाडा रे यांना म्हणतात तर, या सरकारला रडू येतंय. आता काय यांना नववा महिना लागला का?” अशा शेलक्या शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!