नवी दिल्ली : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आले. यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले तर अनेक लोक बेरोजगार झाले. अनेक लोकांवर यामुळे आर्थिक संकट ओढवले. मात्र आता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची माहिती आहे.
रेल्वेमध्ये काही पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी लेखी परीक्षेची अट नसणार आहे. फक्त मुलाखतीद्वारे या पदावरील उमेदवार भरले जाणार असून 27 आणि 28 जुलैला वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे ही पदं भरली जाणार असल्याची माहिती रेल्वेने काढलेल्या एका प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा या दरम्यान वेतन मिळणार आहे. याशिवाय त्याला जोडून मिळणारे इतर भत्ते वेगळे असणार आहेत.
27 तारखेपासून विविध पदांसाठीच्या मुलाखतींना सुरुवात होणार असून यामध्ये एनेस्थीशियासाठी 1 जागा, ईएनटीसाठी 1 जागा, जनरल मेडिसिनसाठी 12 जागा, जनरल सर्जरीसाठी 6 जागा, मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा, स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी 1 जागा या स्वरुपाची पद भरण्यात येणार आहे.
तर पेडियाट्रिक्समध्ये 1 पद आणि रेडियोलॉजीसाठी 2 पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीच्या मुलाखती 28 जुलै रोजी घेतल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थांमधून पदवी असणं गरजेचं आहे. तसेच कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक दिवस आपली पाखरे घरटे सोडून जाणार’; सुप्रिया पिळगांवकर यांनी दिली भावूक प्रतिकिया
- मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

