Share

मराठवाड्यातील गोदाकाठ बांबू वनांनी बहरणार

Published On: 

औरंगाबाद –मराठवाड्यातून वाहणाऱ्या गोदावरी आणि मांजरा नदीच्या तिरावर एक कोटी बांबू लागवड करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते पाशा पटेल यांनी दिली. ही लागवड सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यातून करण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. तसेच या दोन्ही नद्या बारमाही वाहण्यासही मदत होईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, गोदावरी आणि मांजरा या नद्यांचा दोन्ही बाजूंचा विचार केल्यास मराठवाड्याला पाच हजार किलोमीटरचा नदी किनारा लाभलाय. मात्र, वृक्षतोड झाल्याने नद्यांना बारा महिने पाणी वाहत नाही. या नद्यांना बारमाही वाहते करायचे असेल तर वृक्ष लागवड केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वड आणि पिंपळ ही वृक्षे चांगली असली तरी या वृक्षांची वाढ होण्यास जास्त कालावधी लागतो. त्यामुळे बांबू हा सर्वात चांगला पर्याय असल्याचे पटेल यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना 7 रुपयांना मिळणार रोप

यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक कोटी बांबूची झाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या झाडाची किंमत 35 रुपये असली तरी केंद्राच्या सबसिडीचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना 7 रुपयाला रोप मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बांबूपासून विविध वस्तू निर्मिती करण्यासाठी कारखाना तयार करण्यात येईल. त्याचबरोबर या पासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठीही ऑस्ट्रेलियाची कंपनी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल तसेच पर्यावरणालाही त्याचा फायदा होईल असे पटेल यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!