मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रांगोली चंदेल यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. राजद्रोह आणि धार्मिक न्हावना भडकावल्या प्रकरणी दोघींची अटक आणि पोलीस कारवाई 25 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. तसेच, कंगनाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची गरज नाही, असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. या आधी 8 जानेवारी रोजी कंगनाचा जबाब नोंदवण्यात आला होता.
Bombay High Court extends protection to actor Kangana Ranaut from arrest till January 25, in connection with a sedition case. (File pic) pic.twitter.com/dWGdI2b10B
— ANI (@ANI) January 11, 2021
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.
या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र, वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती.
यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती. राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्यानंतर कंगना व तिची बहीण रंगोली जबाब नोंदवण्यासाठी आज वांद्रे पोलीस स्थानकात हजर झाल्या होत्या. पोलिसांनी तब्बल २ तास त्यांचा जबाब नोंदवून घेतला. ‘आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही’ असं उत्तर तिने पोलिसांना जबाबत दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणाऱ्या ठाकरे सरकार वरून सरदेसाईंवर झाले मेहरबान
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
- ‘सरदेसाईने मंत्रालयातील फाईल्स दाबून ठेवल्या आहेत त्यामुळे नोकरशाह त्याच्यावर संतापलेले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

