Share

आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाईंची सुरक्षा वाढवली; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

Published On: 

मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.माजी खासदार नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दिग्गज नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असली तरीही राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…असं म्हणत देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

कोण आहेत वरुण सरदेसाई?

वरुण सतीश सरदेसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या भगिनीचे पुत्र. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे, तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी संपादन केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!