मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.माजी खासदार नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दिग्गज नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असली तरीही राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या बाबत विचारणा केली असता, जर आमची सुरक्षा काढून ती महिलांना देणार असतील तर त्या निर्णयाच मी स्वागत करतो अस ही ते म्हणाले.आमची सुरक्षा कमी केल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. आज महाराष्ट्रात रोज किमान तीन ते चार महिला अत्याचाराच्या घटना घडतात. यात बहुतांश महिला ह्या मतिमंद गतीमंद असतात. अशा घटकांना ही सुरक्षा पुरवली जावी अस आपल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकार हे का करतय कशासाठी हे काही मला माहिती नाही. पण हे सगळं आकसापोटी चालल आहे असं वाटत. जे फिरतात त्यांची सुरक्षा कमी करण्याचा काम चालू आहे. कोरोना काळात आम्ही स्वतःच आमची सुरक्षा कमी केली असही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणाऱ्या ठाकरे सरकार वरून सरदेसाईंवर झाले मेहरबान
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाईंची सुरक्षा वाढवली; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
- ‘सरदेसाईने मंत्रालयातील फाईल्स दाबून ठेवल्या आहेत त्यामुळे नोकरशाह त्याच्यावर संतापलेले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

