🕒 1 min read
मुंबई : कोरोना काळात एमपीएससी परीक्षांचे आयोजन रखडले होते. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्व परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संक्रमणाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलल्याचा जाहीर केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे या राज्य सेवा पूर्व परीक्षा व सर्व प्रकारच्या भरती परीक्षा या पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी मराठा समाज देखील आक्रमक झाला होता. दुसरीकडं, मंत्री छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध केला होता. या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात यासाठी ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला होता.
अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० आता रविवार, १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी घेण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल असं आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणाऱ्या ठाकरे सरकार वरून सरदेसाईंवर झाले मेहरबान
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाईंची सुरक्षा वाढवली; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
- ‘सरदेसाईने मंत्रालयातील फाईल्स दाबून ठेवल्या आहेत त्यामुळे नोकरशाह त्याच्यावर संतापलेले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
