मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शनिवारी (९ जानेवारी) वढु बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही मोजके धारकरी देखील होते. तब्बल ७ वर्षांनी त्यांनी या स्थळाला भेट दिल्याचे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
भिडे हे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी आल्याचे समजताच शिक्रापूर पोलिसांनी त्यांना तिथे थांबण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेऊन पुढच्या दौऱ्यावर प्रस्थान केले. त्यांनी वाजेवाडी (ता.शिरूर) येथील एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या या दौऱ्यासंबंधात शिक्रापूर पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. तर, सोशल मीडियामध्ये त्यांच्या या भेटीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी छत्रपती संभाजी महाराजच्या समाधीस्थळाची भेट दिली आहे. दरम्यान,छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळा जवळील कोरेगाव-भीमाप्रकरणी त्यांचा हात असल्याचा काही संघटनांनी दावा केला होता. कोरेगाव-भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरेगाव-भीमा शौर्यदिनावेळी दिली होती.
भीमाकोरेगाव, वढू या भागात काही समाजकंटकांनी सामाजिक शांतता बिघडवली होती त्यामागे संशयित आरोपी म्हणून संभाजी भिडे यांचे नाव होते. भिडे यांनी नुकतीच या भागाला भेट दिल्याचे वृत्त समजते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने #संभाजीभिडे यांना भीमाकोरेगाव या संवेदनशील भागात जाण्यास बंदी घालावी. pic.twitter.com/K7nix1aJhy
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) January 10, 2021
दरम्यान, आता महाराष्ट्र शासनाने संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव या संवेदनशील भागात जाण्यास बंदी घालावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
- महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाईंची सुरक्षा वाढवली; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
- “या माणसाचं काय करावं? पक्षांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”
- ‘माझ्या कुटुंबियांवर केलेले आरोप सिद्ध केले नाही तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू’
- ‘सरदेसाईने मंत्रालयातील फाईल्स दाबून ठेवल्या आहेत त्यामुळे नोकरशाह त्याच्यावर संतापलेले आहेत’
- सोनू सूदची BMC विरोधात याचिका; आज होणार सुनावणी


